टीम इंडियाचे ‘हे’ दोन खेळाडू विश्वक्रिकेटमध्ये आपली सत्ता गाजवतील, वीरेंद्र सेहवाग याची मोठी भविष्यवाणी
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात आघाडी घेतलीये. विशाखापटनम येथे हा सामना सुरू असून इंग्लंड संघाला आता विजयासाठी 332 धावांची गरज तर टीम इंडियाला 9 विकेट घ्यायच्या आहेत. टीम इंडियाकडूना युवा खेळाडूंनीच या सामन्यात दमदार खेळी केली. याचाच धागा पकडत टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने दोन खेळाडूंची नावं घेत मोठी भविष्यवाणी केलीये.
काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
दुसऱ्या कसोटी सामन्यामधील द्विशतकवीर आणि शतकवीर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसूव यशस्वी जयस्वाल तर दुसरा शुभमन गिल आहे. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावांची द्विशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावामध्ये टीम इंडिया अडचणीत असताना शुबमन गिलने 104 धावांची शतकी खेळी केली. दोघांनी केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली आहे.
वीरेंद्र सेहवाग याने दोघांचे फोटो शेअर करत, दोन्ही खेळाडूंना पाहून आनंद झाला. दोघेही 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे येत्या दशकामध्ये त्यापेक्षा जास्त काळ दोघेही क्रिकेटविश्वात आपली सत्ता गाजवतील अशी शक्यता असल्याचं वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.