आर्थिक घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना त्याऊपर यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज येथे केले. दिल्लीत ‘सुशासन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोलताना ते पुढे म्हणाले की ज्यांना गुड गव्हर्नन्स हवे, त्यांनी आधी या मिशनसाठी समर्पित होऊन काम केले पाहीजेत सुशासन जीवनात उतरवूनच सुखी होऊ शकतो असेही ते म्हणाले. आपल्याकडे गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मला दहा वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. गुड गव्हर्नन्ससाठी कमिटमेंट पाहीजे. याशिवाय ते शक्य नाही. आपल्याकडे म्हण आहे की जर भंडाऱ्यावर भंडाऱ्यानेच हात मारला तर काय होणार, कुंपणच शेत खायला लागले तर काय करणार ? असा दाखला देत काय टाळायला हवे ते जे.पी.नड्डा यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी देशाची राजनीती बदलली

पंतप्रधानांनी देशाची राजकारणाची संस्कृतीच बदलून टाकली. त्यांनी सुशासनाचा अजेंडाच बदलून टाकला. त्यांनी हे सिद्ध केले की जर तुम्ही स्रिया, युवक, शेतकरी आणि गरीब यांची चिंता करीत असाल तर तुम्ही सर्व समाजाची चिंता करीत आहात. हेच सबका साथ, सबका विकास आहे अशा शब्दात जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानांचे कौतूक केले आहे.

आपल्या उद्धाटनपर भाषणात जेपी नड्डा यांनी म्हटले की विकासासाठी डिलिव्हरी आणि लीकेज वर काम केले पाहीजे. सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचल्या पाहीजेत. त्यासाठी प्रयत्न हवेत. पंतप्रधानांनी ज्या प्रकारची हेल्थ पॉलीसी देशाला दिली आहे. त्याने प्रत्येक नागरीकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न झाला. आज सर्वांना ही आपल्या गरजेची आरोग्य योजना आहे असे जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

‘आयुष्यान भारत’ सुशासनाचे प्रतिक

आयुष्यमान भारत ही योजना लोकांमध्ये आरोग्य विमा म्हणून प्रसिद्ध झाली. यासाठी पंतप्रधानांनी आम्हाला टार्गेट दिले होते. हेच गुड गव्हर्नन्सचे उदाहरण आहे. छत्तीसगढचा मजूर जर तामिळनाडूत उपचार करतो तर त्याला तेथेच पैस मिळतात. कोरोनात 25 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. लोकांना जनधन खात्याचा फायदा मिळाला. आधी एका लायसन्ससाठी लोकांना घाम गाळावा लागायचा आज होम डिलिव्हरी होत असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

आरोग्या सारखेच आज देशाच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोदी सरकारला सर्वांना एका जागी आणण्याचे धोरण आहे. उज्ज्वला, उजाला, सौभाग्य योजना, जल जीवन मिशनचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. आज डोंगरात राहणाऱ्यांनाही पाणी मिळत आहे. लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे. लोक युपीआयचा सहज वापर करीत आहेत. सर्वांना पुरेशी वीज मिळत आहे. चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ मिळत आहे. हायवे तयार झाल्याने प्रवासाची बचत होत आहे. हेच गुड गव्हर्नन्सचे मॉडेल असल्याचेही नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button