मनारा चोप्रा हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, ते मला पैसे पाठवत होते, परंतू…
मुंबई : बिग बॉस सीजन 17 चा फिनाले काही दिवसांपूर्वीच पार पडला. या सीजनने मोठा धमाका नक्कीच केला. या सीजनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले एक नाव म्हणजे मनारा चोप्रा हे होते. मनारा चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मनारा चोप्रा ही बिग बाॅस सीजन 17 ची सेकेंड रनर अप देखील ठरलीये. मात्र, मनारा चोप्रा हिच्यासाठी हा प्रवास नक्कीच इतका जास्त सोपा नव्हता. घरात अनेक आरोप मनारा चोप्रा हिच्यावर लावण्यात आले. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिने मनारा चोप्रा हिच्यावर काही गंभीर आरोप केले, ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.
आता मनारा चोप्रा ही बिग बाॅस 17 मधून बाहेर आलीये. नुकताच मनारा चोप्रा हिने मोठा खुलासा केलाय. मनारा चोप्रा ही बिग बाॅसच्या घरात असताना प्रियांका चोप्रा ही मनाराचा सपोर्ट करताना दिसली. नुकताच मनारा चोप्रा हिने पापाराझी यांच्यासमोर मोठे भाष्य केले. हेच नाही तर मनारा हिने प्रियांका चोप्राने तिला काय टिप्स दिल्या हे देखील सांगितले.
मनारा चोप्रा म्हणाली की, प्रियांका चोप्रा (मिमी दीदी) आणि जोनस जिजू यांच्यासोबत मी तब्बल दोन तास फोनवर बोलत होते. मला मिमी दीदीने सर्वात अगोदर माझा घसा व्यवस्थित करण्यास सांगितला. कारण बिग बाॅसच्या घरात सतत बोलून बोलून माझा घसा हा खराब झाला. तिथे सतत बोलावेच लागत असत.
मिमी दीदी मला म्हणाली की, तू खूप जास्त जबरदस्त गेम बिग बाॅसमध्ये खेळला. मी जरी दररोज शो बघू शकले नसले तरीही माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे अपडेट होते. अनेक लोक मला तुझ्या पोस्ट टॅग करत होते. पुढे मनारा म्हणाली की, मिमी दीदीला हे खूप आवडले की, मी कुटुंबाचा उल्लेख बिग बाॅसच्या घरात करणे टाळले.
पुढे मनारा चोप्रा म्हणाली की, मिमी दीदी आणि जिजू मला गिफ्ट काय हवे हे विचारत होते. त्यांनी म्हटले की, आम्ही तुला पैसे पाठवतो. मात्र, मी त्यांना म्हटले की, मला पैसे अजिबात नको…मला खूप सारे फक्त कपडे पाठवा. आता मी माझ्या गिफ्टची वाट पाहत आहे. मी बिग बाॅसच्या घरात येण्यापूर्वी प्रियांका चोप्रा (मिमी दीदी) ला कोणतीही कल्पना दिली नव्हती.