अडीच दिवसांसाठी मकर राशीत महालक्ष्मी योग, राशीचक्रावर होणार असा परिणाम
मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित पाहिलं तर मकर राशीत यावेळी ग्रहांची मांदियाळी आहे. एक दोन नव्हे तर चार ग्रह आहेत. त्यात ग्रहांच्या युती आघाड्या होताना दिसत आहे. काही शुभ, तर काही अशुभ युती आहेत. मकर राशीत मंगळाने गोचर केल्याने एका ठरावीक कालावधीनंतर महालक्ष्मी योग जुळून येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अशी स्थिती असणार आहे. चंद्र ग्रह 8 फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत चंद्र 10 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रहासोबत चंद्राची युती होणार आहे. मंगळ ग्रह 5 फेब्रुवारीपासून मकर राशीत विराजमान झाला आहे. तसेच या राशीत 15 मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत जेव्हा जेव्हा चंद्राशी संपर्क येईल तेव्हा महालक्ष्मी योग जुळून येईल. 8 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 या कालावधीतही हा योग जुळून येणार आहे.
चंद्र आणि मंगळाची युती धनसंपत्तीकारक असते. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यात आहे. तसेच राजकीय, टीव्ही आणि वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना या कालावधीत प्रसिद्धी मिळते. चला जाणून घेऊयात चंद्र आणि मंगळाची युती कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरणार ते..
मेष: या राशीच्या दशम स्थानात महालक्ष्मी योग तयार होत आहे. त्यामुळे जातकांना आपल्या कामात अपेक्षित यश मिळेल. कमी मेहनतीत जास्त परतावा असे हे दिवस असतील. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे आश्चर्याचा धक्का बसेल. चंद्रामुले चंचलता कमी होईल. तर मंगळामुळे नेतृत्वाची क्षमता वाढेल आणि नवी जबाबदारी खांद्यावर पडेल.वैवाहिक जीवनातही आनंदी वातावरण असेल.
वृश्चिक : या राशीच्या तिसऱ्या स्थानात ही युती होत आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित धनलाभ होईल. एखाद्या नवीन जॉबची ऑफर मिळेल. वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी असल्याने जीव भांड्यात पडेल. तसेच कामाचा लोड इतर कंपन्यांपेक्षा कमी असल्याने आनंदून जाल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. भावकीचा वाद संपुष्टात येईल.
मकर : या राशीच्या लग्न स्थानात ही युती होत आहे. यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आपणं ठरवलेलं ध्येय गाठता येईल. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले वाद संपुष्टात येतील. जातकांना आपल्या कामातून आनंद मिळेल. तसेच हाती पैसा खेळता राहील.