महाराष्ट्र ग्रामीण

भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई : मोदी सरकारवर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप पुन्हा सुरु केला आहे. ‘EVM है तो मोदी है’, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या चंदीगड पॅटर्नमधून या बाबीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ईव्हीएम घोटाळ्याविषयी यापूर्वी पण विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोग हा सरकारचा पोपट असल्याची घणाघाती टीका पण अनेकदा करण्यात आली आहे. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर तर मोदी सरकारवर टीकेला अधिक धार आली आहे.

ईव्हीएम तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात

यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली. लोकसभा 2024 निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नियोजनावर त्यांनी टीका केली. त्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरळमार्गाने निवडणूक नाही जिंकणार

भाजप सरळ मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीत भाजप चंदीगड पॅटर्न आणू पाहत आहे. चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण रामभक्तांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि आप पक्षाची आठ मते अवैध ठरवून भाजपचा चंदीगडमध्ये महापौर निवडून आणल्याचा आरोप त्यांनी केला.

कुठे सापडल्या ईव्हीएम

उत्तर प्रदेशातील चांडोल येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन आढळल्या. आसाममध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या एका ट्रकमध्ये 300 ईव्हीएम मशीन सापडल्या. भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांमध्ये भाजप पदाधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बहुसंख्य लोक हे गुजराती असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकोट येथील मनसूखभाई हे त्यात आहेत. लोकशाही निवडणुकीत भाजप मनसूख पॅटर्न, चंदीगड पॅटर्न आणू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button