महाराष्ट्र ग्रामीण

40 रेस्टॉरंट, 7100 लोकांच्या राहण्याची क्षमता…; जगातलं सर्वात मोठं जहाज तुम्ही पाहिलंय का?

मुंबई: समुद्राची सफर करायला कुणाला आवडत नाही? एखाद्या अलिशान जहाजात बसावं अन् समुद्र सफर करावी, असं अनेकांना वाटतं. यासाठी अनेक क्रुझ आणि जहाजं उपलब्ध आहेत. सगळ्या सोयी- सुविधांनी परिपूर्ण जहाजं समुद्र सफर घडवून आणतात. पण जगातलं सर्वात मोठं जहाज कोणतं? असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल. त्याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल. जगातल्या सर्वात महकाय जहाजाविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात…

जगातलं सर्वात मोठं जहाज

जगातलं सर्वात मोठं जहाज आहे, आयकॉन ऑफ द सीज… हे महाकाय जहाज रॉयल कॅरिबियन ग्रुपचं आहे. जितकं प्रशस्त हे जहाज आहे. तितकंच अलिशान देखील आहे. या जहाजावर तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तुमच्या खानपानाची- मनोरंजनाची इथे सोय असेल. या जहाजाची लांबी 365 मीटर आहे. तर यात 20 आहेत. या जहाजात एकावेळी 7 हजार 100 लोक एकावेळी प्रवास करू शकतात. या जहाजात 7 स्विमिंग पूल आणि 6 वॉटर स्लाईड्स आहेत. 40 पेक्षा जास्त रेस्टॉरंट या जहाजावर आहेत. तसंच बार आणि लाऊंज देखील आहेत. आयकॉन ऑफ द सीज हे जहाज तयार करण्यासाठी 149 अब्ज रूपयांचा खर्च आला आहे.

महाकाय जहाजाच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात

27 जानेवारीला फ्लोरिडाच्या मायामीहून या जहाजाने पहिल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कॅरिबियन समुद्रातल्या वेगवेगळ्या बेटांना हे जहाज भेट देणार आहे. हे महाकाय जहाज तयार करण्यासाठी 149 अब्ज रूपयांचा खर्च आला आहे. तुम्हाला जर या क्रुझची सफर करायची असेल तर 1.5 लाख ते 2. 24 लाख रूपये मोजावे लागतील.

पर्यावरणवाद्यांचा विरोध

जरी हे जहाज प्रचंड अलिशान असेल तरी अनेक पर्यावरणवाद्यांनी यावर टीका केलीय. हे जहाज LNG इंधनावर चालतं मात्र यातून मिथेन वायू उत्सर्जित करेल, असा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल, असं पर्यावरणवादी म्हणत आहेत. तर 24 % पेक्षा जास्त ही क्रुझ ऊर्जा कार्यक्षम आहे, असा दावा रॉयल कॅरिबियन ग्रुपने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button